पुणे : पुण्यात मागील महिन्यात २८ जानेवारीला अजितदादांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत ५ लोकांनीही जीव गमावला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. महाराष्ट्राचा धुरंधर नेता गमावल्याने तो दिवस नागरिकानासाठी काळा ठरला आहे. या अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी पुरावे दाखवत डीजीसीए आणि व्हीसीआर कंपनीवर निशाणा साधला आहे. दरम्यान यावरून सगळीकडे संशय व्यक्त होत असताना आज सीआयडी ने पुढे येऊन या प्रकरणाचा तपस योग्य दिशेने चालू असल्याचे सांगितले . हा अपघात आहे कि घातपात , याला कुणी जांबाबदार आहे का ? या मागे गुन्हेगारी षडयंत्र आहे का ? या तीन मुद्यांवर हा तपस चालू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात झाला त्याची माहिती जनतेसमोर आली पाहिजे. DGCA कडून मंगळवारी एक अहवाल आला. त्यात VSR कंपनीतील त्रुटी समोर आल्यानंतर DGCA ने या कंपनीची लिअरजेट विमाने उड्डाण करण्यास बंदी आणली. मात्र त्या अहवालातही या कंपनीला वाचवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करण्यात आला. VSR कंपनी चूक असेल तर DGCA चीही चूक आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. VSR कंपनीच्या मालकाला अटक केली पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे. तसेच सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात सीआयडीने पत्रकार परिषद घेऊन अतिशय वेगाने तपास होत असल्याची माहिती दिली आहे.
पुण्यातील अनेक संस्था या तपासात आहेत. सीआयडी आकस्मिक मृत्यूच्या अँगलने तपास करत आहे. पुणे आणि मुंबईचे पोलीस अधीक्षक तपास करत आहेत. एएआयबी कडून तपास सुरु आहे. त्यांचा अहवाल आम्ही लवकरच समाविष्ट करू. तपास अतिशय वेगाने सुरु आहे. पुण्यातील फॉरेन्सिक लॅब,या सोबतच केंद्रातील अनेक संस्था या तपासात सहकार्य करत आहे. आकस्मित मृत्यूचा तपास cbi कडे वर्ग करण्याचा महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. तपास योग्य दिशेने चालू आहे. अतिशय वेगाने याचा तपास होत आहे. कलम 194 अंतर्गत या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे. निष्कर्ष समोर आल्यावर पुढच्या कायदेशीर प्रक्रिया करू असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.